Sunday, October 28, 2012

शालार्थ : DDO LEVEL 2 ची कामे





शालार्थ : DDO LEVEL 2 ची कामे


(शाळांचे CODE तयार करणे)



थोडक्यात.....नक्की काय ?
                 CONFIGURATION या टप्प्यात नक्की काय करायचय तर...
टप्पा १ : DDO LEVEL २ चा CODE व शाळेसाठी DDO CODE / USER NAME बनवायचे आहे. 
टप्पा २ : शाळा DDO CODE तयार करून शाळेला एक प्रमुख नेमायचा आहे, व शाळेची माहिती भरून आपली शाळा मान्यतेसाठी(APPROVE) REPORTING DDO कडे पाठवायची आहे.

  •  CONFIGURATION करताना आपल्याला शालार्थशी संबंधित MASTER DATA CENTER (MDC) वर काम करावयाचे आहे. MDC म्हणजेMASTER DATA CENTER.. माहितीचा एकत्रित साठा.. 
टप्पा १ 

प्रथम शालार्थ च्या WEBSITE वर जावे ..
http://www.shalarth.maharashtra.gov.in/
USER ID - MDC .
PASSWORD - ??? (collect from office)टाकून LOGIN  करावे.

अ}
आता आपल्याला  एक  window पहावयास मिळेल..तिच्यामध्ये ह्या  path ने जावे.


  •  STATE ADMIN >ADMIN OFFICE MASTER 


या ठिकाणी फक्त आपली administration office आहे का हे तपासायचे आहे.
  • STATE ADMIN >DISTRICT OFFICE 


इथे आपले district office आहे का हे पहावयाचे आहे. दुसरे  अपेक्षित नाही..


 


  • STATE ADMIN > DEPARTMENT OFFICE   



येथेही फक्त आपले DEPARTMENT  तपासायचे आहे..   जसे EDUCATION DEPARTMENT PRIMARY.......

---------------------------------------------------------------------------------
आता आपले काम सुरु झाले...
DDO LVL2 व शाळेचे (DDO LVL 1) CODE बनवणे.
१) DDO LVL २ चा CODE :
state admin >Reporting DDO For District/Taluka Offices
     या window वर जाल ..



 इथे आपल्याला DDO LVL२ चा USER ID मिळतो..
त्यासाठी Defining LEVEL2 DDO for office having no DDO Code यावर CLICK करा.
नंतर खालील window open होईल .



  • इथे TREASURY NAME ,SUB-TREASURY NAME आपल्या तालुक्याच्या अनुषंगाने भरावयाचे आहेत.
  • ADMIN OFFICE मध्ये Municipal Corporation असे निवडावे. 
  • DISTRICT OFFICE, ADMINISTRATIVE DEPT.,FIELD DEPT.  DROP DOWN  LIST मधून निवडायचे आहे.
  • OFFICE NAME - Municipal Corporation, Navi Mumbai असे लिहावे.
  • DDO NAME -शिक्षणाधिकारी नाव लिहायचे आहे. 
टीप-
 TREASURY  NAME ,SUB-TREASURY NAME,ADMIN OFFICE ,DISTRICT OFFICE हि माहिती भरल्यावर लगेच आपला DDO LVL2 चा CODE तयार होईल.



२)DDO LVL १/शाळेचा CODE :

 या ठिकाणी आपल्या शाळेचे ID तयार होतात..
State Admin ->Create Admin Office


 या ठिकाणी खालील माहिती भरावी..
  1. ADMIN OFFICE - Municipal Corporation ,DISTRICT OFFICE व DEPARTMENT- PRIMARY EDUCATION DEPARTMENT SELECT करावे.
  2. FINAL LEVEL मध्ये LVL3 निवडावे .
  3. DDO CODE LVL२ (तो मागच्या STEP मध्ये गटशिक्षणाधिकारी यांचा मिळाला आहे.) तो टाकावा.
  4. DDO CODE LVL ३ (जो शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग)तो भरावा.
  5. ***DDO चे नाव (इथे मुख्याध्यापकाचे नाव लिहावे.)
  6. ***GENDER (इथे मुख्याध्यापकाचे)
  7. SUB-TREASURY NAME भरावे.(TREASURY NAME  LVL२ चा CODE लिहिल्यावर आपोआप तयार होईल.) 
  8. DDO DESIGNATION मध्ये HEADMASTER कि INCHARGE HM ते लिहावे.
  9. OFFICE NAME (शाळेचे नाव)
  10. माहिती SAVE करा.
आता आपल्या शाळेचा CODE अपोआप तयार होईल..तो लिहून ठेवावा.
नंतर खालील प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात DDO ,DDO LVL २,DDO LVL ३, LVL ४ अश्या HIERCHY LEVEL मध्ये माहिती दिसेल ..

CODE वर CLICK केल्यानंतर  त्या खाली तो कुठल्या शाळेचा आहे ,ते नाव दिसेल.. अश्या प्रकारे सर्व शाळांचे CODE तयार करायचे आहेत. 
हा CODE USER NAME मध्ये उपयोगात येणार आहे.
शाळेचा USER NAME = CODE _AST 
तर DEFAULT PASSWORD  = ifms123..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


 SYSTEM APPROVAL... 
(शाळेच्या CONFIGURATION ला शालार्थ प्रणालीची मान्यता )....


थोडक्यात काय ...?
 या टप्प्यामध्ये आपल्याला आपण बनवलेली शाळा शालार्थ प्रणालीमधून APPROVE करून घ्यायची आहे. त्यासाठी REPORTING DDO (शिक्षणाधिकारी ,शिक्षण मंडळ ) यांच्या LOGIN मध्ये जावे लागेल..

शाळा आपल्याला दोन ठिकाणी APPROVE करावयाची आहे.
}REPORTS मधून   २}WORKLIST मधून  


१} REPORTS मधून शाळा APPROVE करणे..त्यालाच SYSTEM APPROVAL असे म्हणतात..

REPORTS > SYSTEM APPROVAL 

SYSTEM APPROVAL यावर CLICK केल्यावर खालील WINDOW दिसेल..

मग STATUS मधून शाळा ACCEPT / APPROVE कि REJECT ते निवडावे .. APPROVE केलेल्या शाळा APPROVED OFFICES मध्ये तर REJECTED शाळा REJECTED LIST मध्ये दिसतील ,सर्व शाळा APPROVE झाल्या कि त्यांची "EXPORT TO EXCEL" या OPTION च्या मदतीने PRINT काढावी..  

हे APPROVE महत्वाचे आहे.. हे झाले तरच APPROVAL  SUCCESSFULLY झाले असे समजावे ..

२} WORKLIST मधून शाळा APPROVE करणे,..

या पर्यातून शाळा APPROVE करताना प्रथम आपल्याला DDO LVL २ शिक्षणाधिकारी / प्रशासकीय अधिकारी  यांच्या LOGIN मध्ये जावे लागेल..
WORKLIST > PAYROLL > APPROVE DDO OFFICE 


 त्यासाठी PAYROLL > APPROVE DDO OFFICE वर CLICK  करावे. नंतर वरील  WINDOW OPEN होईल. त्यातील जी शाळा APPROVE  करावयाची आहे तिच्यावर CLICK करावे. CLICK केल्यानंतर शाळेची आपण भरून पाठवलेली माहिती OPEN होईल.

 त्या माहितीच्याखाली APPROVE असा TAB असेल त्यावर CLICK करा .आपली माहिती APPROVED झाली असे COMPUTER सांगेल..

अश्या प्रकारे सर्व शाळा APPROVE करावयाच्या आहेत.
---------------------------------------------------------------------------------


POST CREATION..
         (शाळेसाठी पद निर्मिती)..

थोडक्यात काय :
शालार्थ प्रणालीमध्ये या भागात / टप्प्यात  REPORTING DDO (शिक्षणाधिकारी ,शिक्षण मंडळ  ) यांच्या LOGIN मध्ये जाऊन काम करावयाचे आहे. प्रत्येक शाळेला खालील गोष्टी या भागात मिळणार आहेत ; ज्यामुळे शाळा निर्माण होईल..

१} शाळेला संच मान्यतेनुसार पद मान्यतेची ORDER मिळेल..(ORDER MASTER). 
२} शाळेला संच मान्यतेनुसार पद मिळतील...(ENTRY OF POST ).
३} शाळेला कोणत्या SCHEME अंतर्गत शासनाकडून सहाय्य मिळते ;ती SCHEME मिळेल.
४} शाळेला लागू असलेले ALLOWANCES & DEDUCTION मिळतील.
  • १} शाळेला द्यावयाच्या POST संबंधी G .R ./ ORDER  / शाळा संचिता माहिती प्रत UPLOAD करणे.
WORKLIST > PAYROLL > MASTER SCREEN > ORDER  MASTER  यावर जाऊन CLICK करावे.
नंतर खालील  WINDOW OPEN होईल. त्यातील ADD NEW ENTRY वर  CLICK करावे.



मग वरील WINDOW OPEN होईल.
  • त्यामध्ये शाळा संचिता माहिती प्रत SANCTION NO .,G .R,.ORDER DATE टाकून ORDER / शाळा संचिता माहिती प्रत UPLOAD करायची आहे. 30  SEP च्या पटावरून मिळालेल्या मान्यताप्राप्त शिक्षकांची संख्या (संच मान्यता ) UPLOAD करायची आहे. त्यावरील जावक नं ORDER NO . व DATE  GR DATE म्हणून घेऊ शकतो.. तसेच १९९६ च्या G.R. ची मदत मिळू शकते.
  •  प्रत्येक शाळेला फक्त त्याच शाळेची संच मान्यता बनवून UPLOAD केली तरी चालेल; नाहीतर सर्व महानगरपालिकेतील शाळांसाठी  एकच बनवून ती सर्व ठिकाणी वापरली तरी चालेल.एका शाळेला आपण अधिक ORDER पण देऊ शकतो..
  • DEPARTMENT ,ORDER NO ,ORDER DATE ,GR TYPE -STATE ORDER / DCPS ORDER निवडावा . FILE BROWSE करून "ADD ATTACHMENT " वर CLICK करावे. मग ती ORDER UPLOAD होईल.
  • नंतर ADD बटनावर CLICK करून ती शाळेला मिळावी यासाठी SAVE वर CLICK करा.
"RECORD INSERTED SUCCESSFULLY " अशी छोटी WINDOW आली कि OK करावे .. त्या शाळेला ORDER मिळेल.. 
टीप : ORDER दिल्या तरच POST देता येतात.
-------------------------------------------------------------------------------
२} शाळेला POST  देणे.

शाळा APPROVE केल्यानंतर शाळा चालवण्यासाठी आवश्यक असणारा STAFF RECRUIT  करायचे आहे. त्यासाठी WORKLIST > PAYROLL >MASTER SCREEN > ENTRY OF POST वर CLICK करावे. त्यानंतर खालील WINDOW OPEN होईल.


 "ADD NEW ENTRY "वर CLICK करावे.मग खालील WINDOW OPEN होईल.

या मध्ये TYPE OF POST -PERMANANT /TEMPORARY, REPORTING DDO मध्ये ज्या शाळेला POST द्यायच्या आहेत ती शाळा निवडावी. GR NO / GR DATE आपण MASTER ORDER मध्ये दिलेल्या GR ची असेल. DESIGNATION मध्ये HEADMASTER /ASST TEACHER /शिक्षण सेवक अश्या POST निवडाव्यात. POST कधीपासून SANCTION आहेत (३० SEP पासून..???) व किती POST ADD करायच्या आहेत, ते निवडावे.
फक्त TEMPORARY POST भरताना SERVICE END DATE भरावी लागेल.
----------------------------------------------------------------------------------
३} शाळेला SCHEME देणे 

आपली शाळा शासनाकडून कुठल्या SCHEME वर वेतन सहाय्य घेते ,ती SCHEME प्रत्येक शाळेला ADD करायची आहे..
WORKLIST > PAYROLL > ORAGANAZITAION SCHEME या PATH ने जावे.
  • प्रत्येक शाळेला SCHEME ADD करावयाची आहे. 
  • महानगरपालिकेसाठी २२०२०२०८ (OTHER LOCAL BODIES)या SCHEME CODE शी संबंधित SCHEME आहे. तरीही ती CONFIRM करून घ्या.
  • वरील आकृतीमधील माहितीप्रमाणे माहिती भरावी.आणि ADD SCHEME वर CLICK करावे.
  • SCHEME आपोआप ADD होईल. (शाळेच्या LOGIN मधून BILL GROUP MAINTAINACE मध्ये पाहता येईल.)
-------------------------------------------------------------------------------
  • ४} शाळेला मान्य असणारी ALLOWANCES & DEDUCTION देणे.
WORKLIST > PAYROLL > DEPT .ELIGIBILITY FOR ALLOWANCES &DEDUCTION  
वरील window मध्ये शाळेचे नाव निवडायचे आहे. ते निवडल्यावर खालील window open  होईल.
ALLOWANCES ,DEDUCTION ,NON GOV. DEDUCTION.,LOANS ETC. आपल्याला लागू असतील त्या ठिकाणी मार्क करावे. CHANGE केल्याची दिनांक तिथे लिहायची आहे.
उदा. ALLOWANCES - HRA, DA, TA, CLA,...
    DEDUCTIONS - GPF ,GIS ,P.T.,INCOME TAX...
  NON GOV. DEDUCTION. - LIC, CO.OP.BANK ,MIS..
  LOANS &ADVANCES - F.A. , GPF(IAS),HBA HOUSE...
-------------------------------------------------------------------------------


WORKLIST > PAYROLL  > OFFICE /ORAG > SCHEME

  • BILL APPROVE करणे
  • CONSOLIDATED BILL APPROVE  करायचे काम DDO करतो.
  • WORKLIST > PAYROLL >MASTER SCREEN >APPROVE BILL.
---------------------------------------------------------------------------------
  • ANNUAL INCREMENT ORDER काढणे.
  • १  जुलैला  वेतनात होत असलेल्या  INCREMENT  संबंधी  ORDER काढणे. व ती ORDER UPLOAD  करणे 
  • Worklist  > Payroll  > Master Screens  > Approve Annual Increment
---------------------------------------------------------------------------------
  • EMPLOYEE   CONFIGRATION FORM APPROVE करणे. 
  • कर्मचारी माहिती form approve करणे.
EMPLOYEE DETAILS ची माहिती REPORTING DDO(शिक्षणाधिकारी,शिक्षण मंडळ)ला FORWARD केल्यानंतर ती APPROVE करवी.
WORKLIST >PAYROLL > EMPLOYEE FORM FOR SHALARTH  > VERIFICATION OF FORM 1
नंतर खालील WINDOW दिसेल.

वरील आकृतीमध्ये चोकोनात EMPLOYEE ची नावे  आहेत. अश्या LIST दिसतील . नावावर CLICK केले असता खालील  FORM (६ TAB मधील OPEN होईल .) TAB OPEN होईल. सर्व माहिती तपासावी.

FORM  चुकीचा असेल तर PERTICULAR REASON देवून REJECT करावा. APPROVE वर CLICK केले असता , त्या EMPLOYEE चा SHALARTH ID तयार होईल . (हा ID आपल्याला मुख्याध्यापकांच्या LOGIN मधून  पुढील PATH वरून पाहता येईल. WORKLIST >REPORTS> EMPLOYEE STATISTICS..)
 
टीप :
DCPS लागू नाही.
पुढील सर्व कामे या ID च्या सहायानेच होणार आहेत.

-----------------------------------------------------------
  • कर्मचारी JOIN  किंवा RELIEVE करणे.  
  • कर्मचारी एखाद्या  ठिकाणी हजर करणे किंवा त्याला कार्यमुक्त करणे या गोष्टी DDO करतो.
  • WORKLIST > PAYROLL > JOINING/RELIEVING EMPLOYEE यावर जाऊन क्रिया कराव्यात .
आकृती क्र.६
कधीपासून  मुक्त करायचे किंवा हजर करायचे या दिनाकाची नोंद करून त्यासंबंधी माहिती भरावी..
 अश्या प्रकारची वेग-वेगळी कामे DDO2 करतो......

No comments:

Post a Comment